लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था

शिक्षण – पुनर्वसन – स्वावलंबन

संस्थेबद्दल थोडक्यात

लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी ही सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग, अनाथ व विशेष मुलांच्या संगोपन, शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे बालगृह, नागभिड, स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा, नागभीड, जि. चंद्रपूर, लड्डू विशेष दत्तक संस्था (SAA), गडचिरोली आदी संस्था यशस्वीरित्या चालविण्यात येत आहेत. लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत एक सेवाभावी संस्था आहे. संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील वंचित, दिव्यांग व विशेष गरज असलेल्या मुलांना शिक्षण, संरक्षण व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे.

1️⃣ शैक्षणिक उपक्रम

1. आदिवासी व दुर्बल घटकांसाठी आश्रमशाळा सुरू करणे व चालविणे
2. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, उद्योग प्रशिक्षण केंद्र चालविणे
3. मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा व विशेष शिक्षण सुविधा उपलब्ध करणे
4. प्रौढ शिक्षण कार्यक्रम राबविणे
5. बालकांसाठी बालवाडी, शिशुगृह व बालसंवर्धन केंद्र सुरू करणे

2️⃣ महिला व युवक सक्षमीकरण

1. महिलांसाठी शिवणकला, भरतकाम, ब्युटी पार्लर, संगणक इत्यादी प्रशिक्षण वर्ग
2. युवकांसाठी कौशल्य विकास व मार्गदर्शन शिबिरे
3. सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे जनजागृती

3️⃣ सामाजिक व आरोग्यविषयक कार्य

1. आरोग्य व स्वच्छता मोहिमा
2. वृक्षारोपण कार्यक्रम
3. व्यसनमुक्ती जनजागृती
4. गरीब, निराधार व अनाथांसाठी सहाय्य केंद्र

4️⃣ समाजजागृती व विकास कार्यक्रम

1. शैक्षणिक व सामाजिक विषयांवर कार्यशाळा, परिसंवाद आयोजन
2. दुर्लक्षित घटकांसाठी शासनाच्या विविध योजना राबविणे
3. सामाजिक समरसता व राष्ट्रीय एकात्मतेसाठी उपक्रम

Scroll to Top