About us
लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था
लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी ही सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग, अनाथ व विशेष मुलांच्या संगोपन, शिक्षण व पुनर्वसनासाठी कार्यरत संस्था आहे.
लोककल्याण बहुउद्देशिय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर या स्वयंसेवि संस्थेचा संस्था नोंदणी क्रमांक अधिनियम 1 अन्वये नोंदणी क्रमांक 11 (म) 96 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये नोंदणी क्रमांक एफ-5087 (चं) पंजीबद्ध असून ISO नंबर ISO-QMS-9001MPC-63 आहे. संस्थेकडे आयकर विभागामार्फत 12A असून त्याचा यूनिक रजिस्ट्रेशन नंबर AAAJL1574CE20241 आहे, त्याचप्रमाणे सेकशन 80G नोंदणीकृत असून त्याचा युनिक रजिस्ट्रेशन नंबर AAAJL1574CF20251 आहे. या संस्थेअंतर्गत महिला व बालविकास विभागा मार्फत स्वामी विवेकांनद कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे बालगृह नागभीड, स्वामी विवेकांनद बालसंगोपन केंद्र ब्रम्हपुरी, विशेष दत्तक संस्था गडचिरोली हे उपक्रम सुरु आहेत.
Our Mission
संस्थेच्या माध्यमातून खालील उपक्रम यशस्वीरित्या चालविण्यात येत आहेत:
स्वामी विवेकानंद कनिष्ठ व वरिष्ठ मुलांचे बालगृह, नागभिड स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची निवासी शाळा, नागभीड, जि. चंद्रपूर लड्डू विशेष दत्तक संस्था (SAA), गडचिरोली संस्था प्रत्येक बालकाच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित आहे.
Our Vision
लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत एक सेवाभावी संस्था आहे.
संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील वंचित, दिव्यांग व विशेष गरज असलेल्या मुलांना शिक्षण, संरक्षण व पुनर्वसन सुविधा उपलब्ध करून देणे. दिव्यांग व विशेष मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुरक्षित वातावरण आणि स्वावलंबनाचे प्रशिक्षण देणे. प्रत्येक विशेष बालक समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्षम नागरिक म्हणून उभे राहावे.
-
संचालक मंडळ
- १.श्री. मंगल जनार्धन पेटकर (अध्यक्ष)
- २.श्री. विवेक हरिभाऊ पवनीकर (उपाध्यक्ष)
- ३.श्री. पुरुषोत्तम जगन्नाथ चौधरी (सचिव)
- ४.श्री. राहुल विनोद चहांदे (सह सचिव)
- ५.सौ. गीता पुरुषोत्तम चौधरी (कोषाध्यक्ष)
- ६.श्री. सुभोजित उदयशंकर पॉल (सदस्य)
- ७.श्री. संजय सोपानराव दुर्योधन (सदस्य)
- ८.श्री. महेश दादाजी हजारे (सदस्य)
- ९.श्रीमती स्नेहा प्रशांत निमगडे (सदस्य)
